Breaking

Tuesday, 5 November 2019

गूगल ची नवीन रिस्पॉन्सिव्ह डिस्प्ले ऍड्स आता जाहिरातदारांना 15 इमेजेस अपलोड करू देते

गुगल ने अशातच रिस्पॉन्सिव्ह डिस्प्ले ऍड्स च्या संदर्भात १ नवीन बदल जाहीर केला आहे, ज्यानुसार आता डिजिटल मार्केटिअर्स आता ५ लोगो , ५ वेगवेगळे वर्णन, यासोबतच १५ वेगवेगळे फोटो टाकु शकतील. पि पि सी   जाहिरात व्यवस्थापकांनो हि तुमच्यासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे.
तर या पि पि सी जाहिरात व्यवस्थापकांसाठी काय असा विशेष या बदलात गुगल घेऊन आला आहे.
1) जाहिरात व्यवस्थापनासाठी नवीन लेआउट आणि काही अतिरिक्त पर्याय 
गुगल आपल्या जाहिरातींपैकी कोणती जाहिरात हि  चांगले निकाल देऊ शकेल याची चाचपणी करण्यासाठी मशीन लर्निंग वापरून अधिक उत्पादनक्षम परिणाम तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.
प्रत्येक फोटो किंवा वर्णन याचे तुम्हाला आता त्याचा परिणाम कसा आहे, बेस्ट , गुड , लो  किंवा लेअरनिंग  यात वर्गीकरण केलेला सापडेल.
Responsive Display Google Ads
रिस्पॉन्सिव्ह ऍड्स आता आपोआप उपलब्ध स्वरूपात आणि उपलब्ध जागेत समावेशित केल्या जातील.
या  नवीन बदलाचा फायदा हा कि, हा बदल जाहिरात व्यवस्थापकांना फोटो व त्याचे संबंधित वर्णन याचा वापर करून तुमच्या अपेक्षित जनसमुहापर्यंत पोहचण्यास मदत करेल.
गुगल च्या अंर्तगत अभ्यासानुसार वेगवेगळे वर्णन , फोटो आणि ठळक मथळा यांच्या मदतीने पूर्वीच्या आवृत्तीपेक्षा तितक्याच खर्चामध्ये १० टक्के जास्त लोकांपर्यंत पोहचता येणार आहे.
2) जाहिरातींसाठी आपले फोटोज निवडणे 
गुगल 1200 X 628 इतक्या आकाराच्या फोटोची शिफारस करतो किंवा तुम्ही 1.91:1 या आकारमानाचा ( लँड्स्केप प्रमाण ) फोटो वापरु शकता. गुगल च्या अनुषंगाने या आकाराचा वापर केल्यास जाहिराती काहीही तक्रार न येता दिसतील. सोबतच फोटो हा  वर्णनाच्या खुप जवळ ठेवु नका जेणेकरुन ते दर्शकांना अस्ताव्यस्त दिसेल.
फोटोवरचा मजकूर एकूण 20% भागात येऊ शकतो तसेच आपण फोटोला आडव्या बाजुला एकुण 5% क्रॉप करू शकता.
सोबतच लोगो च्या फोटोचे  आकारमान 1200 X 1200 असावे, तुमच्याकडे या आकारमानाचा फोटो नसल्यास  1:1 या प्रमाणात किंवा  128 X 128 हे आकारमान असणाऱ्या फोटोचा तुम्ही वापर करू शकता. हे आकारमान तुमची जाहिरात कोणत्याही प्रमाणात दाखवण्यासाठी सर्वोत्तम आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot